आसमानी वादळी संकटातही महसूल वीज व नगरपालिका विभागाचे कार्य उल्लेखनीय झुकले नाहीत रात्र दिवस कार्य करून दोन दिवसात जनतेला दिलासा पन्नास वर्षात इतके मोठे वादळ झालेच नाही जुने 80 वर्षाचे बुजुर्ग जाणकारांचे म्हणणे– पत्रकारांकडून महसूल वीज व नगरपालिका यंत्रणांचा भावनिक सन्मान पाचोरा तहसीलदार यांचे अविस्मरणीय विचार ऐकून पत्रकार झाले भावनिक

जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस तर पाचोरा तालुक्यासह वादळी पावसाने दिनांक 11/6/2025 बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले जोरदार वाऱ्यांसह आलेल्या अवकाळी पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले रस्ते बंद झाडे रस्त्यांवर आडवी झाली शेतातील केळी व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले गावोगावी अंधाराचे साम्राज्य पसरले अनेक भागांमध्ये संपर्क तुटला तर काही भागात नागरिकांना घरातच अडकून राहावे लागले या नैसर्गिक संकटसमयी ज्या तीन यंत्रणांनी जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस झोप आणि अन्न यांचा त्याग करून कार्य केले महसूल विभाग महावितरण कंपनी आणि नगरपालिका प्रशासनाचे कार्य हे समाजसेवेचे उत्तम उदाहरण ठरले या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या भीषण संकटात केवळ प्रशासनाचे कर्तव्य म्हणून काम न करता एक आपलेपणा आणि सामाजिक दायित्व म्हणून जबाबदारी पार पाडली आणि याच कार्याची नोंद घेत पाचोऱ्यातील पत्रकार बांधवांनी या तिन्ही यंत्रणांच्या प्रतिनिधींना भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूपात सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता पाचोऱ्यातील पत्रकार बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेल नीलमजवळ एकत्र जमले यानंतर या सर्व पत्रकारांनी महसूल विभाग महावितरण आणि नगरपालिका या तिन्ही यंत्रणांच्या कार्यालयात जाऊन वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमात प्रांताधिकारी तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी क्लार्क कोतवाल आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सहाय्यक अभियंते शाखाधिकारी वीज लाइनमन सफाई कामगार जलपुरवठा विभाग आरोग्य विभाग वाहनचालक कार्यालयीन सहाय्यक अशा अनेक पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि कृतज्ञतेचे भाव होते महसूल विभागाचे प्रांताधिकारी तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी क्लार्क कोतवाल यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथकांनी संकट सुरू होताच गावोगाव धाव घेतली पंचनामे नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न समजून घेणे आणि शासकीय मदतीचे अहवाल तयार करून वरच्या स्तरावर पाठवणे क्षणाचा विलंब न करता त्यांनी तत्परता दाखवली गावागावात पाणी साचले होते जनावरे वाहून गेली होती भिंती कोसळल्या होत्या अशा सर्व ठिकाणी महसूल यंत्रणा मदतीसाठी तत्काळ पोहोचत होती महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय धाडसाने काम केले अनेक भागांत खांब कोसळले होते तारा तुटल्या होत्या ट्रान्सफॉर्मर निकामी झाले होते काही ठिकाणी विजेच्या खांबांवर झाडे कोसळली होती त्यामुळे धोका वाढलेला होता या सर्व संकटांच्या पार्श्वभूमीवर वीज कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कामावर उतरले अनेकांनी तब्बल 36 तास झोप न घेता केवळ चहा घेऊन वीज जोडणीच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नागरिकांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे हे खरे प्रकाशदूत ठरले पालिकेच्या सफाई बांधकाम जलपुरवठा व आरोग्य विभागांनी देखील आपापल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे निभावल्या गटारे मोकळी करणे पडलेल्या झाडांची व्यवस्थित छाटणी करून एका बाजूला करून रस्ता मोकळा करणे पाणी शिरलेल्या घरांमध्ये मदत करणे दवंडी देणे उघड्यावर पडलेले संसार यांना तात्पुरता आश्रय देणे अशा अनेक महत्त्वाच्या कामांत पालिकेचे अधिकारी व कर्मचारी झपाट्याने कार्य करत होते संपूर्ण संकट काळात महसूल विभाग महावितरण व नगरपालिका प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय अभूतपूर्व होता महसूल विभागाने तयार केलेले अहवाल तातडीने वीज वितरण आणि पालिकेकडे पोहोचवले महावितरणने पालिकेसोबत मिळून बाधित भागांत वीजप्रवाह सुरळीत केला पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघड्यावर पडलेल्या वीज तारांभोवती कुंपण घालून नागरिकांचे रक्षण केले या तिन्ही यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच नागरिकांचा त्रास लवकर कमी झाला सामान्य जीवनात पत्रकार हे प्रश्न उपस्थित करणारे असतात परंतु या संकटसमयी पाचोऱ्यातील पत्रकारांनी एक वेगळी आणि उल्लेखनीय भूमिका पार पाडली त्यांनी प्रशासनाच्या या झोकून देऊन केलेल्या कामगिरीची दखल घेतली आणि त्यांचे सर्वांचे आभार मानण्यासाठी हा सन्मान समारंभ आयोजित केला “फक्त टीका न करता चांगले कार्य देखील लोकांपुढे आणणे हेही पत्रकारितेचे कर्तव्य आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले या कार्यक्रमात अनेक पत्रकारांचे डोळे पाणावले टाळ्यांच्या गजरात फुलांच्या हारांत आणि मनःपूर्वक कृतज्ञतेच्या शब्दांत झालेला हा सत्कार फक्त औपचारिक नव्हता तर एक सामाजिक संदेश देणारा होता संकट आलं की कधी कधी देव दिसत नाही पण देवासारखी माणसं नक्की भेटतात हे अनेकांच्या ओठांवर होते या सन्मान सोहळ्यामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील सकारात्मक नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे यापुढील काळात प्रशासन अधिक चांगली सेवा देईल नागरिक अधिक सहकार्य करतील आणि पत्रकार समाजाला जोडणारा सेतू म्हणून भूमिका पार पाडतील असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला पत्रकारांकडून घेतलेला हा उपक्रम म्हणजे केवळ सत्कार नव्हता तर समाजाला दिलेला एक सकारात्मक संदेश होता – की जेव्हा संकट येते तेव्हा समाजाला उभं राहण्यासाठी प्रशासनाची गरज असते आणि जेव्हा प्रशासन चोख जबाबदारी पार पाडतं तेव्हा समाजाचंही कर्तव्य आहे त्यांचा सन्मान करणे हा सन्मान त्याचसाठी होता – त्यांच्यासाठी ज्यांनी काळोख्या रात्रीही दिवा घेऊन वाट दाखवली



