जिल्हा जळगाव हा राष्ट्रीय लढा आहे संपूर्ण भारतात एकाच दिवशी एकाच वेळी विविध मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चाचे १५ रोजी आयोजन आज संपूर्ण देशात शेतकरी कष्टकरी रात्रंदिवस मेहनत करून त्याला मिळते काय? आज साखर 45 रुपये किलो उसाचा भाव 2 रुपये 80 पैसे शेतकऱ्यांना बियाणे मटरेल औषधी याच्यावर अजून जीएसटी कृषी प्रधान देशात इतके नालायक सरकार काँग्रेस आणि बीजेपी सरकार शेतकरी कष्टकरी यांचा विचार कधीच करणार नाही आमदार खासदार मंत्री स्वतः करोडपती होतात त्यासाठी शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय ठेवून हे दोन्ही सरकार स्वतंत्र भारतात आजपर्यंत शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या छत्रपती राजे यांच्या शिवशाहीच्या काळात का होत नव्हत्या? एक शेतकरी आत्महत्या करतो पण लाखो शेतकरी आत्महत्या करतात त्याला कारण काय विचार केला कधी?

जळगाव (वा.) शेतकरी शेतमजुर कर्मचारी कष्टकरी विद्यार्थी युवा बेरोजगार व बहुजन समाजाला येऊ घातलेल्या गुलामीतुन मुक्त करण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन जळगाव शहरात बुधवार १५ ऑक्टोबर रोजी दु. १२ वा. जी. एस. ग्राऊंड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बसस्टॅण्डमार्गे स्वातंत्र चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयत देण्यात येणार आहे यात ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाओओबीसींची जातीनिहाय जनगणना बोधगया बौध्दविहार मुक्ती असे ५ राष्ट्रीय मुद्दे व १४ बहुजन समाजाच्या समस्यांचे मुद्दे काही स्थानिक मुद्यांवर लक्ष वेधण्यासह मागण्या मान्य करण्यासाठी जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे जनआक्रोश मोर्चात भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या सामाजिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे तसेच मोर्चात बहुजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. मोर्चा यशस्वीतेसाठी शहरात प्रचार करून जनजागृती करण्यात येत असून भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष देवानंद निकम भारत मुक्ती मोर्चा खान्देश प्रभारी नितीन गाढे बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हाध्यक्ष अरुण जाधव राष्ट्रीय ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील यांच्यासह विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे








