ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शहरातील सुपुत्र व देशसेवेत कार्यरत असलेले जवान विजय तांबे हे काही दिवसांपूर्वी सुट्टीवर पाचोरा येथे आले होते त्यांनी सुट्टीचा कालावधी कुटुंबीयां सह घालवित असतानाच आज वरिष्ठ लष्करी कार्यालया कडून मिळालेल्या आदेशानुसार त्यांना तात्काळ सेवेस हजर होण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत


जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शहरातील सुपुत्र व देशसेवेत कार्यरत असलेले जवान विजय तांबे हे काही दिवसांपूर्वी सुट्टीवर पाचोरा येथे आले होते त्यांनी सुट्टीचा कालावधी कुटुंबीयांसह घालवित असतानाच आज वरिष्ठ लष्करी कार्यालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार त्यांना तात्काळ सेवेस हजर होण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर विजय तांबे हे उद्या दिनांक १० मे शनिवार रोजी सकाळी ६ वाजता अमृतसर एक्सप्रेसने पुन्हा देशसेवेसाठी रवाना होणार आहेत. त्यांनी आतापर्यंत १३९ मिडियम रेजिमेंटमध्ये नायक या पदावर सलग १८ वर्षे कर्तव्य बजावले असून, सध्या ते ग्वालियर येथे होणाऱ्या प्लॅटून मोहिमेत सहभागी होणार आहेत या निमित्ताने ज्यांना विजय तांबे यांना निरोप द्यायचा आहे त्यांनी १० मे रोजी सकाळी ५.३० वा. पाचोरा रेल्वे स्थानकावर उपस्थित राहावे
ते आपले पत्रकार मित्र मिलिंद सोनवणे यांचे पाहुणे आहेत देशासाठी सतत सज्ज असलेल्या या वीर जवानाला निरोप देताना अभिमान आणि देशप्रेमाची भावना जागृत होणार हे नक्की विजय तांबे यांच्या सेवेला सलाम!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button