ताज्या बातम्या

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन दीनानाथ मंगेशकर फाउंडेशन तर्फे पुणे महानगरपालिकेची 38 लाख 62000 हजार 874 रुपयाची थकबाकी तर एका गरीब गर्भवती महिलेले 10 लाख रुपये अनामत रक्कम भरली नाही म्हणून महिलेचे उपचार नाकारले उपचार न झाल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले


लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन दीनानाथ मंगेशकर फाउंडेशन तर्फे पुणे महानगरपालिकेची 38 लाख थकबाकी तर एका गरीब गर्भवती महिलेले 10 लाख रुपये अनामत रक्कम भरली नाही म्हणून महिलेचे उपचार नाकारले सविस्तर वृत्त असे की पुणे महानगरपालिकेचा सामान्यांना एक न्याय तर उच्च श्रीमंतांना दुसरा न्याय देशात असे घडत आहे सरकार चुप्पी साधत आहे लता मंगेशकर फाउंडेशन तर्फे चालविल्या जात असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे गर्भवती महिलेने 10 लाखाची अनामत रक्कम न भरल्यामुळे उपचार सपशेल नाकारले तिच्या मृत्यूमुळे कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेचे तब्बल 38 लाख 62 हजार 874 रुपयांचा कर सन 2019 पासून भरलेला नाही सर्वसामान्य जनतेच्या घरापुढे पुणे महानगर नगरपालिका बँड वाजवते आणि उच्च श्रीमंत लोकांना सुट का देते? असे जनता विचारत आहे इकडे गरीब गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असताना अनामत पैसे भरले नाही म्हणून उपचार नाकारले त्या महिलेस वेळेवर भरती करून तिच्यावर उपचार केले असते तर ती महिला वाचली असती त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांनी व विरोधकांनी व विविध सामाजिक संस्थांनी रुग्णालयासमोर आंदोलन केले या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निषेध होत आहे सामान्य माणसांनी जावे तरी कुठे सरकारी सुविधांच्या नावाने सरकारकडून पैसा घेतला जातो हा पैसा कोणासाठी? आणि एकीकडे गरिब रुग्णांवर उपचार होत नाही याची दक्षता सरकार कधी घेणार असा जनसामान्य जनतेच्या आंदोलनातून सुर निघत आहे भारताला स्वतंत्र मिळवून 75 वर्ष आपण साजरी केली स्वतंत्र झाल्यानंतर देशात अन्न वस्त्र निवारा पाणी सरकार देऊ शकत नाही याबाबतीत संविधानात डॉक्टर बाबासाहेब यांनी घटनाक्रम लिहिले ते फक्त कागदावरच राहिले जनसामान्यांचे बेहाल काँग्रेस आणि भाजपा करीत आहे हे तर समोर दिसत आहे जनसामान्यांनी करावे काय? महागाई बेरोजगारी देशात थांबता थांबत नाही सरकारी जागा शिल्लक असताना त्या जागेवर शिकलेले बहुजन विद्यार्थी भरती केले पाहिजे परंतु सरकार खाजगीकरण करून देशाचे विघटन खाजगीकरन करीत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button