पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 23.11.2024 रोजी तीन वाजता ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल एकूण आरोपी 39

पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून त्याचे कारण दिनांक 20/ 11/ 2024 रोजी आमदार किशोर पाटील यांची विजय मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मानसिंगा कॉर्नर शिवाजीनगर येथे आली असताना गैर कायदेशीर मंडळी जमून दगडफेक केली डीजे वाहनाच्या काचा फोडल्या त्यामुळे डीजेचे नुकसान झाले दगडफेक केल्यामुळे नाचत असलेल्या फिर्यादीच्या उजव्या हाताचे बोटांना गंभीर जखम झाली असून साक्षीदार यांना सुद्धा मार लागलेला आहे असे आरोपीचे म्हणणे आहे जमलेल्या गैर कायदेशीर मंडळी यांनी सार्वजनिक ठिकाणी दलित समुदायास जातीवाचक शिवीगाळ केली तसेच आमदार किशोर पाटील यांनी तुम्हाला माजवून ठेवले त्यामुळे तुम्हाला जास्त मस्ती आली आहे अशा प्रकारचे गैरवर्तन केले वरील विषयांद्वारे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून वरिष्ठांना ईमेल द्वारे माहिती कळवली सदर गुन्ह्याचा तपास मा: उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा हे करीत आहे


