शासनाचा महसूल बुडवणाऱ्या आरटीओ वर गुन्हा दाखल करा अन्यथा आमरण उपोषण करणार सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे

आतापर्यंत आरटीओ खात्यात इतका मोठा भ्रष्टाचार होत असून सुद्धा अनेक अर्ज मुख्यमंत्र्यांना दाखल करून त्याची दखल घेतली जात नाही धुळे नंदुरबार येथील आरटीओ कार्यालयात तत्कालीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या अधिपत्याखाली 133 बनावट वाहनांचा बॅक लॉक नोंदीमुळे शासनाच्या झालेल्या महसूल हानीचे ऑडिट करून संबंधित अधिकाऱ्या कडून ती वसुली करण्यात यावी आणि या सर्वांविरुद्ध एलसीबी कडून गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असा इशारा जळगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी दिला याबाबत धुळे येथील आरटीओ कार्यालयात जाऊन परिवहन अधिकारी अशोक गंगाराम पवार यांची भेट घेतली त्यांना निवेदन देण्यात आले नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक कांतीलाल अहिरे लिपिक टंकलेख जयसिंग बागुल यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला असून नोंदी संपलेल्या मालिकेतील शिल्लक राहिलेल्या आकर्षक क्रमांकाचा वापर करून 83 वाहनाची आणि 0,4 प्रणालीवर जिल्ह्याबाहेरील वाहन क्रमांक घेऊन परस्पर डाटा एन्ट्री करून 50 वाहनांची बोगस नोंदणी करून अशा 183 वाहनांच्या बनावट बॅकलॉग नोंदी केल्याने सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडाला महसूल हानींपैकी 83 वाहनांच्या शासकीय महसूल हानी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन नंदुरबार येथील गू’ र ‘क्रमांक 395 ऑब्लिक 2022 दिनांक 28/ 6/2022 रोजी शासनाची अंदाजी त किंमत 66 लाख 59 हजार 900 रुपयांची फसवणूक केली म्हणून अशी फिर्याद जयसिंग बागुल यांनी दिली 4’0 pranalith जिल्ह्याबाहेरील वाहन क्रमांक घेऊन परस्पर डाटा एन्ट्री करून 50 वाहनांच्या बोगस नोंदणी झाली असून शासनाचा महसूल बुडवलां असून अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही उपप्रादेशिक परिवहन नंदुरबार येथील एकूण 133 वाहनांचा बनावट बॅकलॉग आणि नोंदणीची त्यामुळे झालेल्या महसुलीची हानी त्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव हे गुन्हा दाखल करण्याचे टाळाटाळ करत आहे त्यांनी फक्त 83 वाहनांचा महसुल हानीचा गुन्हा दाखल केला आहे तसेच परिवहन आयुक्त मुंबई जिल्हाधिकारी नंदुरबार पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना 50 वाहनांचा बोगस नोंदणी केलेल्या व त्यापासून महसूल हनीची चुकीची माहिती दिली त्यामुळे या सर्व प्रकरणास प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध सुद्धा एलसीबी शाखा नंदुरबार यांच्याकडून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे गुन्हे दाखल झाले नाही तर मी आमरण उपोषण आपल्या कार्यालयासमोर करील असा इशारा निवेदनात सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी दिला आहे


