ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील अतिशय जुने मुदत संपलेले पोलिस निवासस्थानां सह पोलिस स्टेशनचे भूमिपूजन 11 मार्च रोजी दुपारी 3 वाजता आमदारांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांची लाभणार उपस्थिती


पाचोरा शहरातील अतिशय महत्त्वपूर्ण जागेवर असलेली पोलिसांची निवासस्थान खूपच जुन्या पद्धतीचे म्हणजेच त्याची मुदत संपली होती त्यामुळे अनेक दिवसापासून पोलीस स्टेशन आणि पोलीस निवासस्थानाचा प्रश्न पाचोरा आमदार यांनी मार्गी लावलेला आहे त्यानिमित्ताने आज भूमिपूजन आमदारांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांची लाभणार उपस्थिती पाचोरा शहरातील पोलिस लाईन या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस स्टेशन तसेच अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी दुपारी 3 वाजता आमदार किशोर पाटील यांचे हस्ते होणार असून यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचेसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे पाचोरा शहरातील भडगाव रोड स्थित पोलिस कर्मचारी निवास्थानांची झालेली दुर्दशा पाहता तसेच शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता आमदार किशोर पाटील यांनी गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत तब्बल 21 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली आहे एकच ठिकाणी पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार असून यामुळे पोलिस बांधवांच्या कामात अधिक सुसूत्रता येणार आहे या कामामुळे दुरावस्था होऊन मोडकळीस आलेल्या पोलिस वसाहती मधील निवाऱ्यांपासून त्यांना सुटका मिळणार आहे या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार किशोर पाटील जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी प्रांताधिकारी भूषण अहिरे अप्पर पोलिस अधीक्षक नेतकर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे तहसीलदार विजय बनसोडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल मुख्याधिकारी मंगेश देवरे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची उपस्थिती लाभणार आहे तरी सर्वांनी या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button