ताज्या बातम्या

8 मार्च महिला दिनानिमित्त पाचोरा येथील स्पंदन कौन्सिल सेंटर च्या संचालिका ललिता पाटील यांची भूमिका जिच्या हातात पाळण्याची दोरी तीच जगा उद्धारी महिला दिन हा जगात महत्वपूर्ण दिवस आहे महिलांनी राजमाता जिजाऊ शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले माता रमाई संत मुक्ताई अशा अनेक बहुजन शूरवीर मातांनी भारतीय संस्कृती निर्माण करून भारतीयांना म्हणजेच बहुजनांना हक्क अधिकार दिला


8 मार्च महिला दिनानिमित्त पाचोरा येथील स्पंदन कौन्सिल सेंटर च्या संचालिका ललिता पाटील यांची भूमिका जिच्या हातात पाळण्याची दोरी तीच जगा उद्धारी महिला दिन हा जगात महत्वपूर्ण दिवस आहे महिलांनी राजमाता जिजाऊ शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले माता रमाई संत मुक्ताई अशा अनेक बहुजन शूरवीर मातांनी भारतीय संस्कृती निर्माण करून भारतीयांना म्हणजेच बहुजनांना हक्क अधिकार दिला महिला दिन 8 मार्च 2025 लेखन. सौ ललिता ताई पाटील जागतिक महिला दिन 8 मार्च आपण दरवर्षीच साजरा करतो यावर्षीही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम सत्कार समारंभ आयोजित केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी मी स्वतःही जाणार आहे पण हे सर्व करताना मनात कुठेतरी एक खंत असते एक महिला म्हणून खरंच आपण योग्य दिशेने जात आहोत का?की अजून काही आपल्याला करता येईल (आपल्या भगिनींसाठी) पण त्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत.. ज्यांना खरंच गरज आहे अशा अनेक भगिनी हतबल होऊन कुणाच्यातरी मदतीच्या हाताची वाट बघत आहेत हे खोटे खोटे सत्कार समारंभ मानसन्मान कुठेतरी मनाला खिन्न करतात महिला दिनाच्या दिवशी खरच महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान झाला पाहिजे आणि सन्मान केला गेल्यानंतर आपण करत असलेल्या चांगल्या कार्याला अजून पाठबळ मिळते हे ही तेवढेच सत्य परंतु हल्ली या गोष्टी बरेच वेगळं वळण घेत आहेत कर्तुत्व म्हणजे नक्की काय याची अजून ठळक व्याख्या स्पष्ट झालेली नाही.हल्ली माझ्या भगिनींमध्ये अनेक प्रकारचे द्वेष राग लोभ या सर्व गोष्टींचा अतिरेक होत चालला आहे मान्य आहे कौटुंबिक सामाजिक आर्थिक त्याचबरोबर संसारीक पातळीवर अनेक महिलांचा लढा चालू असतो ज्याकडे डोळसपणे बघण्याची वृत्ती आपण जोपासली पाहिजे विना कारणच कुणालाही दोष देऊन आपण तिच्यापेक्षा महान कसे हे दाखवण्याचा प्रयत्न करणं चुकीचं मुळात म्हणजे महिला दिन हा महिलांनी जास्त समजून घेणे गरजेचे आहे सध्या सकाळी न्यूज पोर्टल किंवा न्यूज पेपर बघितल्यावर अनेक विचित्र बातम्या वाचायला बघायला मिळतात त्यामुळे मन अगदी सुन्न होऊन जाते महिलेचा गळफास महिलेचे पलायन अज्ञान सज्ञान मुली सैराट… हे असं का होत असेल हो याचा आपण कधी विचार करतो का. भौतिक पातळीवर तुलना त्यामुळे अनेक महिला संसारात समाधानी नाहीत मैत्रिणीकडे असणाऱ्या सुख सुविधा दागिने या सर्व गोष्टींची बरोबरी करता येणे शक्य नाही त्यामुळे चुकीचा मार्ग निवडला जातो…. आणि आपण कितीही म्हटलं आपल्या मुलांना संस्कार हे आपण आपल्या वर्तनातून देत असतो… चांगल्या वाईट सवयींचे परिणाम हे योग्य वयात योग्य पद्धतीने सांगितले गेले तर नक्कीच पॉझिटिव्ह बदल घडतो….. लग्न संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात कठोर प्रयत्न करावे लागणार आहेत त्यासाठी आपण महिलाच या प्रयत्नांचा आधारस्तंभ ठरणार आहोत याची नोंद घेतली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी सोडा हो जर आपल्या मुलांचे भविष्य उज्वल करायचं असेल तर आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून तेवढेच गरजेचे आहे महिला दिन हा एक दिवसा पुरता साजरा करून काहीही होणार नाही आपल्या मुलींचे खेळ बदला त्यांचे भविष्य नक्कीच बदलेल मग ना कुणाची वाईट नजर त्यांच्याकडे फिरू शकते ना कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन त्या करू शकणार….जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाउद्धारी हे फार पूर्वी साधुसंतांना समजलं मग आपण कुठे कमी पडत आहोत या गोष्टी समजून घ्यायला याच आत्मचिंतन झालं पाहिजे…. या महिला दिनानिमित्त आपण सर्व भगिनींनी काही गोष्टींचा प्रण केला पाहिजे प्रमुख म्हणजे संस्कारक्षम पिढी घडवणे ही आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जर प्रत्येकीने काळजीने पार पाडली तरच उज्वल भविष्याचा उदय होऊ शकतो.. आपल्या मुलांच्या मनात इतरांविषयी अप्तेष्टांविषयी प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे त्याऐवजी सध्या लहान लहान मुलांचे जर निरीक्षण केलं तर द्वेष भाव जास्त दिसून येतो हे सर्व होते स्पर्धा आणि इतरांशी तुलना याद्वारे बाकी बरच काही लिहिण्यासारखे आहे परंतु वाचकांना कंटाळा येऊ नये म्हणून आटोपते घेते तसे आपण नेहमीच संपर्कात असतो त्यामुळे भेटू पुन्हा
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा सौ ललिता पाटील संचालिका स्पंदन कौन्सिलिंग सेंटर पाचोरा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button