मा;आरोग्य मंत्री तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना आरोग्य विभागात तांत्रिक व साफसफाई करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये तब्बल 3190 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला जनता म्हणते अधिकारी काम करत नाही आणि नेमकं सरकारला तेच पाहिजे होते सरकारने खाजगीकरण सिस्टीम मध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सुरू केली आणि भ्रष्टाचार दहापट सुरू झाला नुकसान कामगारांचे झाले

महाराष्ट्र राज्यातील अनेक दिवसापासून घोटाळ्यांची मालिका बंद होता होत नाही तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना त्यांनी दिलेलं टेंडर वादात सापडले आहे तानाजी सावंत माजी आरोग्यमंत्री यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साफसफाई व आरोग्य केंद्रात तांत्रिक पद्धतीने जी कामे दिली गेली त्यात तब्बल 3190 कोटीचा घोटाळा समोर आला आहे दिलेलं टेंडर वादाच्या भवऱ्यात यापूर्वी जी कामे 70 कोटी रुपयांमध्ये होत होती ती कामे तब्बल 3190 कोटी रुपयांमध्ये का दिली गेली कामे दिली तर त्या कामाच्या मोबदल्यात कामगारांना पूर्ण रक्कम दिली गेलेली नाही उलट त्यांच्या पगारातून सुद्धा कमिशन काढणारे आणखी वेगळेच तानाजी सावंत यांनी आपल्या मर्जीतील कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे तानाजी सावंत अडचणीत येणार का? पाच वर्षांसाठी सुमारे 3190 कोटीचं काम दिलं एका अनुभव नसलेल्या पुण्यातील बीएसए कार्पोरेशन कंपनीला काम देण्यात आलं असे अनेक भ्रष्टाचार तेही मोठ मोठ्या प्रमाणात होत असून जनतेला यामुळेच महागाईला सामोरे जावे लागत आहे एकनाथ शिंदे सरकारातील तीन मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघडे पडले आहेत त्यांच्या सरकारातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 70 रुपयाची लिक्वीड खताची बॉटल 700 रुपयाला खरेदी केली होती. त्याचप्रमाणे मुंडेंनी अनेक कृषी साहित्य खते औषधामधेही मोठा भ्रष्टाचार केल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यानिशी उघड केले आहे शिंदे सरकारातील दुसरे मंत्री आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयाच्या स्वच्छतेचे कंत्राट जवळपास प्रतिवर्ष 700 कोटी रुपयांमध्ये पुण्यातील एका विशेष कंपनीला दिले होते सावंतांनी दिलेले हेच कंत्राट त्याच्या मागील वर्षी प्रतिवर्षासाठी केवळ 70 कोटी रुपयात दिले होते यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात आल्याने फडणीस सरकारने सावंतांनी दिलेले कंत्राट आज रद्द केले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन थोडक्यात म्हणजे 70 रुपयाची खताची बॉटल 700 रुपयात खरेदी केली आणि 70 कोटी रुपयांचे स्वच्छता कंत्राट कोटी रुपयात दिले म्हणजेच शिंदे सरकार मधील मंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा आणि पैसे कमविण्याचा फॉर्म्युला सरळ सरळ दहापटीचा ठरविलेला होता असे दिसते शिंदे सरकारातील आणखी एक मंत्रीअबदुल सत्तर या महाशयांनी तर भ्रष्टाचाराचा कहरच केला आहे आणखी बऱ्याच मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार येणाऱ्या काळात उघड होणार आहेत भ्रष्टाचार संपवण्याच्या मोठ्या आविर्भावात शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री फडणीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर आसूड मात्र चांगले उगारले आहेत पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर ते कार्यवाहीचा आसूड उगारतील असे वाटत नाही त्यांच्या परिवहन मंत्रालयाने उच्च सुरक्षा नंबर प्लेटच्या नावाखाली अंदाजे ३ हजार कोटीचा घोटाळा केला आहे गोवा आणि गुजरातेत १५० रुपयांना मिळणारी नंबर प्लेट फडणीसांचे मंत्री ४५० रुपयात महाराष्ट्रीयन नागरिकांच्या माथी मारून नागरिकांची लूट करत आहेत न्यूज मध्ये बातम्या लागल्यामुळे नंबर प्लेट चे कारस्थान मागे घेण्यात आले आहे सावंतांनी किमान महाराष्ट्रीयन कंपन्यांना कंत्राट तरी दिले होते फडणवीसांच्या मंत्र्यांनी नंबर प्लेट पुरविण्यासाठी नेमलेल्या तीनही कंपन्या गुजराथी आहेत सावंतांच्या भ्रष्टाचाराचे कंत्राट जसे फडणीसांनी तडकाफडकी रद्द केले तद्वतच स्वतःच्या परिवहन मंत्र्यानी भ्रष्टाचार केलेले कंत्राट रद्द करणार आहेत काय ? तसे केले तरच शपथ विधीवेळी दाखविलेल्या भ्रष्टाचार विरोधी आविर्भावातील प्रामाणिकपणा कुठेतरी सिद्ध होईल अन्यथा फडणीसही शिंदेंचाच भ्रष्टाचाराचा पायंडा पुढे चालवत असल्याचे सिद्ध होईल हे निश्चित धर्मवीर कदम अध्यक्ष फूक् संघटना धाराशिव




